दिल्ली (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची आज बीडचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी भेट घेतली. पवार यांनी देशमुख यांना 45 मिनिट वेळ दिला. या वेळी दोघांमध्ये बीड जिल्हयासह राज्यभरातील बदलत्या राजका-रणाबाबत चर्चा झाली.
राजेसाहेब देशमुख यांना शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात. देशमुख हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यामुळे त्यांचा आणि पवारांची जुनी ओळख आहे. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य दादा पाटील, उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, पशुपतिनाथ दांगट यांची उपस्थिती होती