नेकनूर (रिपोर्टर): येळंबघाट येथील एका ज्वेलर्सच्या दुकानासह घरफोडी झाली. यात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम चोरून नेली. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटे कैद झाले आहेत. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
येळंबघाट येथील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. आतील शंभर ग्रॅम चांदी, दोन ते तीन तोळे सोने, असा पन्नास ते साठ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. यासह अन्य एका घरामध्ये चोरीची घटना घडली. या घरातून दहा ते पंधरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मोरया ज्वेलर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.