जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण
केज रुग्णालयाला अचानक भेट
रुग्णालयासह रुग्णांची केली पाहणी
केज (रिपोर्टर): जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी आज सकाळी केजच्या उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील रुगणांची अस्थेवाईकपणे चौकशी करत रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयात वेळेवर हजर राहण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांना दिल्या आहेत.
बीडच्या जिल्हा रुग्णालयाचा कारभार डॉ. नागेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. चव्हाण यांनी आज केजच्या उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी रुग्णांची चौकशी करत रुग्णालयाचीही पाहणी केली. संबंधितांना त्यांनी या वेळी सूचना दिल्या. सर्व डॉक्टरांनी वेळेवर हजर राहून रुग्णसेवा करावी, असे निर्देश सुद्धा त्यांनी या वेळी संबंधितांना दिले आहेत. या वेळी रुग्णालयाचे डॉ. सोळंके, डॉ. करपे, डॉ. आयशा मॅडम, डॉ. नागरगोजे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी वडवणी, चिंचवण, धारूर रुग्णालयालाही डॉ. चव्हाण यांनी भेटी दिल्या.