आष्टीच्या राधिका लॉजवरील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
2 पिडीत महिलांची सुटका 1 जणांवर गुन्हा दाखल
आष्टी पोलिसांची
मोठी कारवाई ; पो.नि.संतोष खेतमाळस यांची अवैध धंद्यावाल्यांना बसली धास्ती दररोजच छापे धाडी
आष्टी( रिपोर्टर ):- आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी पदभार स्वीकारल्यापासून चोर,वाळु तस्कर यांच्या सह अवैध धंद्यावाल्यांना चांगलाच लगाम लावला आहे.दररोज धाडी छापेमारी करुन गुन्हे दाखल करत आहेत.काल रात्री आष्टी शहराजवळील राधिका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी छापा मारत 2 महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात लॉजचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी शहरात अनेक लॉजवर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची चर्चा मागिल काही दिवसांपासून सुरू होती.आष्टी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच नगर जामखेड महामार्गावर आष्टी तालुक्याच्या तहसिल कार्यालयासमोर असणार्या राधिका नावाचे लॉजिंगवर डमी ग्राहक पाठवून तेथे लॉज चालक स्वतः च्या फायद्यासाठी कुंटणखाना चालवत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन काल गुरुवार दि.24 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेत छापा टाकला असता लॉजचालक हा बाहेरून सांगली, कर्नाटक ,बॅगलोर येथून महिला आणून त्यांच्याकडून स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या कुंटणखाना चालवताना आढळून आला येथील 2 पिडीत महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. मालक लहु सानप कासेवाडी ता. आष्टी यांच्यावर कलम 3,4,5,7 ( 2) क नुसार आष्टी पोलिस ठाण्यात सपोनि विजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस हे स्वतः करत आहेत.सदरील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी केली सदरील कारवाई सपोनि विजय देशमुख,सपोनि भाऊसाहेब गोसावी,पो.कॉ सचिन पवळ,मपोशि एम एस शेख,चापोशि दादासाहेब भगत आदींनी केली.