सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या तेव्हा पाणी पेयील -जरांगे
आंदोलनाचा बारावा दिवस
सरकारच्या जीआरमध्ये दुरुस्ती झाल्यावर पाणी पिणार
मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजून काही अवधी लागेल, वेळ द्यावा -अर्जुन खोतकर
आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार
नाही -जरांगे
सराटे अंतरवली (रिपोर्टर): राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार
सरकारने मराठ्यांना सरसकट कुणबी मराठ्यांचं प्रमाणपत्र द्या, जोपर्यंत कुणबी मराठ्यांचं प्रमाणपत्र देण्यात येत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका आज मनोज जरांगे पाटील यांनी घेत लाठीमार करणार्या एसपींसह अन्य दोषींवर अद्याप कारवाई झाली नाही. आम्ही सरकारकडे केलेल्या मागण्यांबाबत अद्याप एकही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतरही मराठा आरक्षणाचा
आणि जरांगे पाटील यांच्या
उपोषणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
शिंदे-फडणवीस-पवार सरकार सोबत जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाशी रात्री महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंद लिफाफा अर्जुन खोतकर यांच्या मार्फत सराटे अंतरवलीत पाठवला. याबाबत खोतकरांनी उपोषणस्थळी रात्री झालेल्या घडामोडींची माहिती देत अडीचपर्यंत बैठक झाल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाबाबत नवा जीआर काढला असल्याचे सांगून सरकार एक एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितल्याचे सांगून 2004 च्या जीआरनुसार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते, त्यात आता सुधारणा केली जाणार असल्याचे म्हटले.
यावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेत वंशवळ असलेल्यांना नको तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, 2004 च्या जीआरचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही, असे म्हणत मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत. संबंधित अधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई केलेली नाही, एकूणच सरकारने आापर्यंत एकही मागणी मान्य केलेली नसल्याचे सांगून जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरुच राहणार असल्याचे म्हटले.










