पुणे (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की कोणाचा अजित पवार की शरद पवार यावरून नवा वाद सुरु झाला आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि नाव कोणत्या गटाला मिळणार यावरून दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका वक्तव्यावरून आता पक्षाचे नाव आणि चिन्ह शरद पवारांच्या हातातून जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.