परळी (रिपोर्टर): लग्न केल्याचे भासवून एका 21 वर्षिय तरुणीवर 15 दिवस शारिरीक अत्याचार केले.त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करूनणतिला हाकलून दिल्याची अत्याचाराची घटना परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी प्रल्हाद मधुकर मुंडे रा. कन्हेरवाडी ता. परळी वै. याने फिर्यादी 21 वर्षिय तरुणी सोबत लग्न केल्याचे भासवुन फिर्यादी सोबत सतत दहा ते पंधरा दिवस शारीरीक संबंध प्रस्थापीत केले.त्यानंतर फिर्यादीस तु इतर जातीची आहेस, तुझी जात चांगली नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. दि. 31/08/2023 रोजी फिर्यादीस घरी घेवुन जावुन तीच्या संमतीविना, इच्छेविरुद्ध बळजबरीने तीच्यासोबत शारीरीक संबंध केले. फिर्यादीस मारहाण करून घरातुन हाकलुन दिले. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुरनं 172/2023 कलम 376, 376 (2) =छ, 417 भादवी सह कलम 3(1) (थ) (1) (1),3 (2) (त) अजाज अप्रका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई अनिल चोरमले हे करत आहेत.