बीड (रिपोर्टर)- धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारले. या आंदोलनामध्ये शेकडो समाज बांधवांचा सहभाग होता.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा पातळीसह राज्यभरात विविध संघटना आंदोलन करतायत. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांनी आरक्षणासाठी धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारले. या आंदोलनात अनेकांचा सहभाग होता.











