शासनाने आरक्षणाचा तात्काळ निर्णय घ्यावा
बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे सराटे अंतरवलीमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी धारूर तालुक्यातील चिखली येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर आज साखळी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला अनेक गावकर्यांची उपस्थिती होती. विशेष करून या आंदोलनात लहान मुलेही सहभागी झाले होते.
मराठा समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांचे साखळी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला धारूर तालुक्यातील चिखली ग्रामस्थांनी पाठींबा दर्शवत आपल्या गावच्या ग्रामपंचायतीसमोर साखळी आंदोलन केले आहे.
दरम्यान मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आलेला आहे. या प्रकरणही संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचार्यांवर कारवार्त्त करावी, आी मागणीही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी चिखलीचे सरपंच विलास शेंडगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.