बीड (रिपोर्टर)- राज्य सरकारने शिक्षकविरोधी धोरण अवलंबविले असून त्याचाच एक भाग म्हणून ज्या ठिकाणी शाळेतील पटसंख्या 20 पेक्षा कमी आहेत, अशा शाळा बंद करून त्या शाळेचे रुपांतर समुह शाळेत करण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या निषेधार्थ आज प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांनाागण्यांचा समावेश आहे.
ालेय पोषण आहार, युडायसप्रमाणे आधार कार्डच्या नोंदी घेणे, निवडणुकीची कामे आदी जवळपास 75 शासकीय कामांना शिक्षकांना जुंपले आहे. शिक्षकांचे लक्ष शिकवण्याऐवजी याच कामात लागलेले आहेत. त्यात भरीस भर म्हणून प्राथमिक शिक्षण हे राज्य घटनेनुसार हक्काचे असताना 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून त्या शाळांचे रुपांतर समुह शाळेत करणे याचा निर्णय घेतलेला आहे, याच्या निषेधार्थ आज प्राथमिक शिक्षक संघाने निषेध मोर्चा काढून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. सोबतच प्राथमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरणे, शिक्षकांसाठी कंपनी न स्थापन करणे, जुनी पेन्शन लागू करणे आदी मागण्याचां समावेश आहे. हा मोर्चा शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण राज्यभर आयोजीत करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी महाराष्ट्र शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, शिक्षक सेना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, एकल शिक्षक संघटना, गुरुजी विचारमंच, छत्रपती संभाजी ब्रिगेड शिक्षक व कर्मचारी संघटना यांनी पाठींबा देत मोर्चात सहभागी झालेक होते.