Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमशिक्षकाच्या मुलाची ऑनलाईन फसवणूक

शिक्षकाच्या मुलाची ऑनलाईन फसवणूक

संभाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल
परळी (रिपोर्टर)- शिक्षकाच्या मुलाला ईमेल आयडीवर एसएमएस पाठवून पैशाची मागणी करत त्याच्याकडून 47 हजार 610 रुपये उकळल्याची घटना परळी शहरात घडली असून या प्रकरणी शिक्षकाच्या फिर्यादीवरून भामट्याविरोधात संभाजीनर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुजयसिंग विजयसिंग माने (वय 51, रा. जुने थर्मल कॉलनी, परळी) यांनी संभाजीनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलाच्या मेल आयडीवर भामट्याने मेल पाठवून पैशाची मागणी केली व मुलाच्या शिक्षकाचा संदर्भ देऊन पैसे परत देण्याचे आश्‍वासन दिेले आणि भीम अ‍ॅपद्वारे 47 हजार 610 रुपये घेतले. या संदर्भात फसवणूक होताच शिक्षक माने यांनी तक्रार दिली.

Most Popular

error: Content is protected !!