बीड (रिपोर्टर)- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असून रोजगार सेवकांच्या मागण्या तात्काळ पुर्ण करण्यात याव्यात, यासाठी आज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनात अनेक ग्रामरोजगार सेवकांची उपस्थिती आहे.
ग्रामरोजगार सेवकांना 18 हजार रुपये किमान वेतन मानधन देण्यात यावे, अतिरिक्त रोजगार सेवक नेमण्यासंदर्भातला 20 फेब्रुवारी 2021 चा शासन रद्द करण्यात यावा, ग्रामरोजगार सेवकांना पुर्णवेळ शासकीय कर्मचार्यांचा दर्जाचा देण्यात यावा, बीड जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे एक वर्षापासूनचे थकित मानधन त्वरीत देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष भाऊराव प्रभाळे, सोपान होळंबे, अंगद खवतड, श्रीकृष्ण मते, जालिंदर शेजुळ, एकनाथ गर्जे, विलास गवळी, वसीम बेग यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.