खाली पडलेले पैसे घेत असताना चोरट्याने संधी साधली
बीड (रिपोर्टर): खाली पडलेले पैसे उचलण्याच्या नादात गाडीला लावलेली हँडबॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या बॅगमध्ये 1 लाख 80 हजार रुपये होते. ही घटना शहरातील नवगण कॉलेजसमोरील पवार हार्डवेअर समोर घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण पांडुरंग बहिरवाळ (रा. पंचमुखी हनुमान मंदिर, पालवण चौक) हे नवगण कॉलेजसमोरील पवार हार्डवेअर समोरून जात होते. त्यांचे पैसे खाली पडल्याने त गाडीला बाजुला उभी करून पैसे घेत असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून गाडीला लावलेली पैशाची हँडबॅग पळविली. या बॅगेमध्ये 1 लाख 80 हजार रुपये होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










