Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टीचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय वार्‍यावर

आष्टीचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय वार्‍यावर


कर्मचारी कुलूप लावून गायब, वरिष्ठ स्तरावरून अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी
आष्टीचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय वार्‍यावर


आष्टी (रिपोर्टर) शहरातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नाही उपस्थित राहत नसल्याने शेतकर्‍यांसह इतर नागरिकांना कामानिमित्त हेलपाटे मारावे लागत असल्याने मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.गुरूवार दि11 नोव्हेंबर रोजी काही शेतकर्‍यांनी पिक कर्ज माफीच्या कामानिमित्त कार्यालयासमोर सकाळपासून बसून राहिले परंतु दिवसभर कोणीच अधिकारी व कर्मचारी या कार्यालयात फिरकले नाहीत. कुलूप लावून गायब झाल्याने हे कार्यालय वार्‍यावर सोडून दिले का असा प्रश्न उपस्थित झाला आहे तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहरातील सहाय्यक निबंध सहकारी संस्था कार्यालयातील एक अधिकारी व एक कर्मचारी लाच घेताना पकडले
होते तेव्हा पासून या कार्यालयात कायम स्वरुपी कोणीच अधिकारी व कर्मचारी हजर राहत नसल्याचे दिसून येत आहे. कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना कार्यालयामध्ये आल्यानंतर कायम कुलूप असल्याचे दिसून येते संबंधित अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कधीही संपर्क होऊ शकत नाही.कार्यालयात कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याने येणार्‍या नागरिकांना प्रचंड मनस्ताप होऊन आर्थिक झळ बसत आहे.याबाबत वरिष्ठ स्तरावरून तात्काळ योग्य ती कारवाई करुन नागरिकाचे कामे वेळेवर व्हावेत अशी मागणी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय हे एक महत्त्वाचे कार्यालय असून या कार्यालयामध्ये शेतकर्यासह सहकारी सेवा सोसायटीच्या कामानिमित्त नागरिकांची नेहमी ये-जा असते परंतु अधिकारी वेळेवर गैरहजर असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी द्यावा व कार्यालयाबाहेर कुलूप लावून फिरणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर तात्काळ कारवाई करावी.
– राजु भोसले
सामाजिक कार्यकर्ते,आष्टी

Most Popular

error: Content is protected !!