कंपनीने कामे अर्धवट सोडली; नागरीकांचे होऊ लागले हाल
रोडच्या कामामुळे जागोजागी पाईपलाईन फुटल्याने लोकांना पाणी मिळेना
केज (रिपोर्टर): केज शहरामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असून ही कामे यश कंन्स्ट्रक्शनकडे आहे. या कंन्स्ट्रक्शनने ठिकठिकाणी अर्धवट कामे करून ठेवल्याने नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामामुळे जागोजागी पाईपलाईन फुटल्याने लोकांना दुष्काळात पाणी मिळत नसल्याने लोकांचे हाल होऊ लागले आहे. सदरील कंपनीने वेळेमध्ये कामे न केल्यास कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शहरवासियांनी दिला आहे.
शहरातील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अंतर्गत रस्ते, नाल्याचे काम सुरू आहे. या कामासाठी जागोजागी खोदकाम सुरू आहे. खोदकाम करून अनेक महिने उलटले तरी त्याठिकाणी कामे पुर्ण करण्यात आले नाहीत. रस्ते खोदल्याने वाहनधारकांना वाहने चालविण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. खोदकामामुळे जागोजागी पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळे नागरीकांना पाणी मिळत नाही. यश कंन्स्ट्रक्शनची जवळपास 78 कोटींची कामे सुरू आहेत. एकही काम या कंपनीने पुर्णत्वाकडे नेले नाही त्यामुळे कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कामे तात्काळ पुर्ण न केल्यास शहरवासियांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देर्यात आला आहे.










