Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडसंपकरी ठाम, प्रशासन आक्रमक, धारूरमध्ये 5 कर्मचारी निलंबीत, आतापर्यंत 22 कर्मचार्‍यांवर निलंबनाची...

संपकरी ठाम, प्रशासन आक्रमक, धारूरमध्ये 5 कर्मचारी निलंबीत, आतापर्यंत 22 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई

प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकात खासगी वाहने, आरटीओ, पोलिसांच्या उपस्थितीत खासगी वाहनातून प्रवाशांची ये-जा
बीड (रिपोर्टर)- एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा या मागणीसाठी भर दिवाळीत सुरू केलेल्या कर्मचार्‍यांचा संप अधिकाधिक चिघळत चालला असून कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने प्रशासनाला पोलीस आणि आरटीओंच्या उपस्थितीत थेट बसस्थानकातून खासगी प्रवासी वाहतुक सुरू करावी लागली तर दुसरीकडे संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर महामंडळाकडून निलंबणाची कारवार्स करण्यात येत असून आज धारूर येथील पाच कर्मचार्‍यांचे निलंबन केले गेले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 22 वाहक, चालकांचे निलंबन केले गेले आहे. आज संध्याकाळपर्यंत आणखी काहींचे निलंबन होण्याची दाट शक्यता आहे.


बीड जिल्ह्यात एसटी महामंडळात काम करणारे 2 हजार 841 कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर गेले आहेत. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीवर हट्ट धरून बसलेल्या संपकरी कर्मचार्‍यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य शासन आणि कर्मचार्‍यात तडजोड होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने आता शासन-प्रशासन व्यवस्थेकडून कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.आज धारूर डेपोतील पाच कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आतापयर्ंत जिल्ह्यात 22 वाहक आणि चालकांचे निलंबन केले गेल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पडवळ यांनी रिपोर्टरला दिली. संपाचे तीव्र पडसाद प्रवाशांच्या गैरसोयीवर होत असल्याने शासनाने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे बीड बसस्थानकातून खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहने प्रवाशांची ने-आण करत आहेत. ही खासगी प्रवासी वाहतूक थेट आरटीओ आणि पोलिसांच्या उपस्थितीत सुरू आहे. इतिहासात प्रथमच खासगी प्रवासी वाहतुकीला संरक्षण देत प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. एसटी कर्मचार्‍यांचा संप हा अधिकाधिक चिघळत असल्याने आणि एसटी सेवा बंद असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वसामान्य नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.


ट्रॅव्हल्वाल्यांकडून लूट सुरुच

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे लांब पल्ल्याच्या सर्व बसेस बंद असल्यामुळे खासगी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होत असल्याची ओरड होत असून मुंबई, पुण्यासाठी 1200 ते 1600 रुपये प्रवाशांना आकारले जात आहेत. याकडे आरटीओसह पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

Most Popular

error: Content is protected !!