शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत बंडखोर 38 आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप झाला आहे. यानंतर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस विभागाला पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.
यात त्यांनी 38 आमदारांची यादी देत या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं नमूद केलं. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.