पाटोदा (रिपोर्टर)-पाटोदा मराठा समाजाला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी आरक्षणाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचा ठराव वैजाळा ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला असून प्रशासनाला याविषयी निवेदन देण्यात आले आहे. पाटोदा तालुक्यातील वैजाळा या ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या काही काळात होणार आहे सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असून त्या अनुषंगाने ग्रामसभेत ठराव घेऊन सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या व आरक्षण मिळेपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला आहे. हा ठराव घेण्यासाठी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी पाटोदा तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन युवकांनी निवेदन दिले.