ढोरवाडीच्या ग्रामसेवकाने केला पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर):- 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह 22 वर्षीय मुला बरोबर लावून सत्यनारायण केल्या प्रकरणी आठ नातेवाईका विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.तर हि घटना केसापुरी येथे घडली आहे.
अल्पवयीन मुलगी साक्षी बळीराम राठोड वय 15 वर्षे हिचा विवाह अनिल भानुदास काळे वय 22 वर्ष यांच्यासोबत दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी मौजे बावी ता. शिरूर जि. बीड येथे लावून दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी मौजे केसापुरी ता. जि. बीड येथे लग्ना नंतर व सत्यनारायण कार्यक्रम केला असल्याने या विवाहला सहकार्य केल्या प्रकरणी
ढोरवाडी ग्रा.प. ग्रामसेवक मोहित ससाणे यांच्या फिर्यादीवरुन महानंदा रोकडे,रा.बावी ता.शिरुर जि.बीड ज्योती, गया ससाणे, सुरेखा कारगडे (तीन्ही रा.व्यंकटेश शाळेच्या पाठीमागे बालेपीर बीड ) पांडुरंग नवले (रा.अंकुशनगर बीड )अनिल भानुदास काळे, भानुदास देविदस काळे (दोन्ही रा.केसापुरी ता.जि.बीड) लोबाजी आडागळे (रा.रविशंकर विद्यालय बालेपीर बीड) आठ नातेवाईका विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील विवाह सोहळा होऊन एक महिन्याचा कालवधी सरुन देखील प्रशासनाला माहिती मिळताच गुन्हा दाखल केला असे समजले आहे.