बीड(रिपोर्टर): शहरातील नगर रोडवर असलेले शासकीय बाल सुधार गृह विविध सुविधांपासून वंचित असून या ठिकाणी 13 मुले निवासगृहात आहेत. त्यांच्या काळजीवाहनासाठी शासनाने ज्या पदाची निर्मिती केली ती पदे पूर्ण पणे प्रभारी असल्यामुळे ही मुले कोठेही भटकतांना आढळून येतात.
ज्यांना माता पिता नाहीत किंवा जे रस्त्यावर रेल्वेमध्ये, बसस्थानकात बेसहारा मुले सापडतात त्यांची रवानगी शासकीय निवासगृहात होते. बीड येथील शासकीय निवास गृहात एकूण 13 मुले आहेत. येथील अधिक्षकांची पोस्ट ही निवासी आहे. दोन काळजीवाहक, एक स्वयंपाकी, एक लिपीक असे असतांना लिपीक सोडता सर्व पदे हे प्रभारी आहेत. अधिक्षकांचे पद प्रभारी असल्यामुळे ते रात्रीच्या वेळेस येथे थांबत नाहीत. त्यातूनच गेल्या चार दिवसापूर्वी येथील लहान बालकांवर लिपीकांकडूनच आत्याचाराची घटना घडली. वास्तवीक पाहता या मुलांना कोणीच नातेवाईक नसतांना येथील लिपीकाचे कृत्ये हे निंदनीय आहे. या मुलांचा राहणे खाने आणि शाळेचा खर्च सर्व सरकारच्या वतीने केला जातो असे असतांनाही या ठीकाणी पूर्णवेळ ही पदे भरलेली नाही. यावर नियंत्रण ठेवणारे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी हे फक्त शासकीय प्रोटोकॉलचे काम करताता त्यामुळे ही सर्व पदे नियमित स्वरुपात भारावी अशी मागणी होत आहे.