Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावसंभाजीनगर, छत्रपती नगरांना समस्यांचा अझगरी विळखा

संभाजीनगर, छत्रपती नगरांना समस्यांचा अझगरी विळखा


निवडणुकीतील आश्वासनांचा लोकप्रतिनिधींना विसर

नाल्या, सिमेंट रस्त्यांची प्रभागवासीयांना प्रतिक्षाच


माजलगाव (रिपोर्टर)- शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती नगर, संभाजी नगर भागात सर्वत्र घाण, कचरा, मुत्री, चौकातील हॉटेलचा कचरा यामुळे या दोन्ही नगरांना समस्यांचा अजगरी विळखा पडला असुन प्रभागवासीयांना नाल्या, सिमेंट रस्ते होणार कधी हा प्रश्न पडलेला आहे तर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा मात्र लोक प्रतिनिधींना विसर पडला आहे.
शहरातील संभाजीनगर, छत्रपती नगर हा भाग पालिकेला सर्वाधिक करांचा भरणा देखिल करतो परंतु असे असले तरी पालिका प्रशासनाचे मात्र
या भागाकडे दुर्लक्ष आहे. रस्त्यांअभावी पावसाळ्यात या भागातील रस्ते पाण्यात गेले होते तर नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधीयुक्त पाणी नेहमीच रस्त्यावर असते. परिणामी या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामीण भागातील रस्ते सिमेंटीकरणाने जोडले गेलेले आहेत परंतु छत्रपती नगर व संभाजी नगर या प्रभाग
क्रं. 1 मध्ये दोन्ही भागात मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात एकही सिमेंट रस्ता झालेला नाही. याउलट शहरातील ज्या भागात सिमेंट रस्ते आहेत. त्या सिमेंट रस्त्यावरच सिमेंटरस्ते नव्याने करण्यात आलेले आहेत परंतु या भागात मात्र विकासाची कामे अद्यापही प्रलंबीतच आहेत. संभाजी नगर भागामध्ये जलवाहिनी जोडण्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे तर एकाही ठिकाणी व्हॉल्व बसविलेला नसल्यामुळे अर्धवट भागात देखिल कमी दाबानेच पाणीपुरवठा होतो.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!