मराठ्यांनो आंतरावली सराटीच्या एैतिहासिक
सभेचे साक्षीदार व्हा..एक दिवस जातीसाठी या
सकल मराठा समाजबांधवांचे आवाहन
माजलगाव(रिपोर्टर): मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जय्यत तयारी आंतरावली सराटी येथे झाली असुन मराठ्यांचे एैतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा, एक दिवस जातीसाठी या…अशा विवीध व्हायरल मॅसेजसह मुळवाटी, निमंत्रण पत्रिकेने सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे. सभेमध्ये लाखोंच्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी दि. 14 ऑक्टोबरला सभेदिवशी माजलगावची बाजारपेठ बंदचा निर्णय घेत व्यापारी महासंघाने सभेला पाठींबा दिला आहे.
तालुक्यातील दोन ते अडीच लाख महिला, पुरूष मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला उपस्थिती लावणार आहेत. त्यादृष्टीने तालुक्यातील गावा – गावात बैठका, साखळी उपोषण, कॉर्नर बैठका तसेच फेसबुक, व्हाट्सअप अशा सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे गावा, वाडी, वस्तीवरील समाजबांधव जागृत झाले असुन सभेला जाण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी व इतर टेम्पो, अॅपेरिक्षा, आयशरच्या बुकींग करण्यात आल्या आहेत तर शनिवारी शहराची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे. दरम्यान सभेला जाणा-या बांधवांची गैरसोय होउ नये याकरीता तुळजाभवानी अर्बनच्या वतीने तालखेड फाट्यावर पाणी बॉटलचे वाटप तसेच शहरातील मौजकर नगर येथे विजय मौजकर यांच्या वतीने चहा व पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.