बीड (रिपोर्टर)- शहरातील खासबाग येथील प्रलंबीत असलेले रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून नागरीकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून खासबाग येथील रस्ता प्रलंबीत आहे. सदरील रस्ता बार्शी रोह ते नर्सरी रोड ते तकिया मस्जिदपासून खासबाग, आडत मार्केट ते खासबाग देवी मंदिरपर्यंत अशा स्वरुपाचा आहे. हा रस्ता नगरपालिकेने मंजूर केलेला आहे. बार्शी रोड ते नर्सरी रोड ते तकिया मस्जिदपर्यंत काम करण्यात आले असून बाकीचे काम मंजूर असतानाही ते प्रलंबीत आहे. हे काम तात्काळ करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सय्यद सालेहा बेगम, शेख आबेद, सय्यद अमान, मोमीन शफीक, मोमीन शाहेद, शेख शब्बीर यांनी केली आहे.