बीड (रिपोर्टर)
यावर्षी कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. ज्या शेतकर्यांना थोडे पाणी आहे ते शेतकरी रब्बी पिकांना पाणी देण्याचे काम करतात. सिंदफणा बंधार्यामध्ये इलेक्ट्रीक मोटारी बसवण्यात आल्या असून येथील दोन मोटारी व पाचशे फूट वायर रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. दुष्काळात शेतकर्यांना हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कुक्कडगाव येथील सिंदफणा नदीवरील बंधार्यात पाणी असल्याने या बंधार्यातून काही शेतकरी आपल्या पिकांना पाणी देण्याचे काम करतात. याच संधीचा फायदा रात्री अज्ञात चोरट्यांनी उचलून बंधार्यावर बसवलेल्या दोन मोटारी व पाचशे फूट वायर चोरून नेले. यापूर्वीही तीन वेळेस मोटारी चोरीला गेलेल्या होत्या. मोटारी चोरणार्या चोरट्यांचा पिंपळनेर पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.