जिल्ह्यात यमाच्या गुरुचे तांडव; 10 ठार
सागर ट्रॅव्हल्सला भिषण अपघात पाच प्रवाशी ठार, 22 जण जखमी
आष्टा फाट्यावर
आज सकाळी
घडली घटना
चालकाला झोप लागल्याने ट्रॅव्हल्स पुलाला धडकली
आष्टी (रिपोर्टर):-बीड जिल्ह्यात अपघाताच्या रुपाने साक्षात यमाच्या ‘गुरू’ने थयथयाट केल्याचे चित्र दोन भीषण अपघातातून अवघ्या जिल्ह्याला पहावयास मिळाले. मुंबईहून बीडकडे प्रवासी घेऊन येणार्या सागर ट्रॅव्हल्सला आष्टा फाट्यावर आज सकाळी सहा वाजता अपघात झाल्याने या भीषण अपघातात पाच प्रवासी जागीच ठार झाले तर 22 प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती स्थानीक नागरीकांना झाल्यानंतर गावकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघातात काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते तर रात्री आष्टी तालुक्यातल्या दौलावडगाव या ठिकाणी रुग्णवाहिकेने समोरील ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत.
मुंबई कडून बीडकडे निघालेली ट्रॅव्हल्स (क्र. एन .एल. 01 बी 2499) आष्टी तालुक्यातील आष्टा फाटा नजीक शिवनेरी हॉटेल जवळ पलटली. ही घटना सकाळी 6 वाजता घडली. या ट्रॅव्हल्समध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळतातच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांसह तरुणांनी जखमींना बाहेर काढण्याचे काम केले. गंभीर जखमींना रुग्णालयात पाठवले आहे. जखमींना उपचारासाठी आष्टी, जामखेड, अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मयतामध्ये 1) धोंडीबा यशवंत शिंदे वय 36 रा. भिल्लारवाडी पो. जाटनांदूर ता. शिरूर जि. बीड, 2) देविदास दत्तू पेचे रा. सौताडा ता. पाटोदा जि.बीड 3) अशोक महादेव भोंडवे पिट्टी नायगाव ता.पाटोदा जि. बीड 4)महमद आसिफ दोस्त महमद खान रा.कुर्ला मुंबई पश्चिम 5)रवी यादव गोंडवे (वय 28) मोतीनगर डीग्रस ता.पुसद जि.यवतमाळ यांचा समावेश आहे. तर 22 प्रवासी जखमी आहेत. बसचालकाला डुलकी लागल्याने(पान 7 वर)
हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती कळताच आ.सुरेश धस यांनी फोन फिरवत तात्काळ कार्यकर्त्यांना मदतीसाठी पाठवले व स्वतः देखील घटनास्थळी धाव घेतली गणेश डोंगरे,सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे,मा.सरपंच केशव बांगर,शिवा घुले,पोखरी उपसरपंच दिपक घुले, सरपंच सतिष ढवळे, सुनिल रेडकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, सुनिल कोठारी, संदेश कोठारी, भाऊ धोंडे, अनंत जोशी,भाऊ गायकवाड, बाळु सोले, विलास भोगाडे,राहुल नवसरे, ज्ञानेश्वर सोले, यांच्या सह परिसरातील तरुण,नागरीक, पत्रकार आष्टी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते, यांनी मदतकार्य केले.
घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पो. गुज्जर, पो. कॉ. विलास गुंडाळे, बब्रुवान वाणी, काळे, अनिल सुंबरे,नामदेव धनवडे, प्रविण क्षिरसागर, सचिन पवळ, आदींनी अपघात ग्रस्तांना मदत केली दवाखान्यात हलवले व पलटी झालेली ट्रॅव्हल्स जेसीबी क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत सुरू केली आहे.
ट्रकला पाठीमागून रुग्णवाहिका धडकली; 4 जण ठार
दौलावडगाव शिवारात घडली रात्री घटना
आष्टी (रिपोर्टर)- ट्रकला पाठीमागून रुग्णवाहिका धडकल्याने या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील चौघे जण ठार झाले आहेत. ही घटना रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान दौलावडगाव शिवारातील दत्तमंदिर जवळ घडली.
आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिर जवळ ट्रक (क्र. एम.एच. 21 द 86000) हा धामनगावकडून अहमदनगरकडे जात होता. रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजुने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेली रुग्णवाहिका (क्र. एम.एच. 16 टी. 9507) ने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सीताराम लोखंडे (वय 33 वर्षे, रा. धामनगाव ता. आष्टी), मनोज पांगु तिरकुडे, पप्पू पांडु तिरकुंडे दोन्ही रा. जाटदेवळा ता. पाथरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय 38, रा. सांगवी पाटण ता. आष्टी) यांचा नगर येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर ज्ञानदेव सुर्यभान घुमरे (वय 85, रा. घाटापिंप्री ता. आष्टी) हे जखमी झाले असून त्यांच्यावर मॅक्सकेअर हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार सुरूअ ाहे. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निगरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस निरीक्षक सातव, रोकडे, केदार, सिरसाट, कांबळे यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली.