‘शासन आपल्या दारी’
अधिकार्यांनी गावात येऊन निराधारांचे अर्ज स्वीकारले
दिंद्रुड (रिपोर्टर)- शासन आपल्या दारी ही मोहीम राज्य सरकारने सुरू केचलेली आहे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी थेट गावात जावून नागरीकांशी संवाद साधत आहेत. दिंद्रुड येथे आज निराधारांचे 125 अर्ज स्वीकारण्यात आले. या वेळी तहसीलदार प्रकाश कोठुळे, तलाठी चव्हाण, सरपंच कोमटवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
विविध कामांसाठी नागरीकांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. नागरीकांच्या सोयीसाठी शासनाने ‘शासन आपल्या दारी’ ही मोहीम सुरू केली. महसूलसह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मंडल विभागात जावून नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींचे निरसन करत आहेत. आज दिंद्रुड येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गतचे 125 अर्ज स्वीकारण्यात आले. या वेळी तहसीलदार प्रकाश कोठुळे, दिंद्रुडचे तलाठी प्रमोद चव्हाण, सरपंच अजय कोमटवार यांची उपस्थिती होती. दरम्यान या कार्यक्रमाला ग्रामसेवकाने उपस्थित राहणे गरजेचे होते, मात्र ते गैरहजर असल्याचे दिसून आले.
कुर्ल्यामध्ये अधिकार्यांच्या विरोधात ‘चले जाव’च्या घोषणा
गावात शासकीय कार्यक्रम होऊ दिला नाही
मराठा आरक्षणासाठी पुढार्यांना गावबंदी करण्यात आली असून आता अधिकार्यांना सुद्धा गावात प्रवेश नाकारला जाऊ लागला. शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत कुर्ला येथे अधिकार्यांसह कर्मचारी आले होते. मात्र संतप्त गावकर्यांनी अधिकार्यांच्या विरोधात ‘चलेजाव’च्या घोषणा देत त्यांना आपला शासकीय कार्यक्रम घेऊ दिला नाही.