Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगाव ग्रामीण पोलिसांची दोन ठिकाणी अवैध धंद्यांवर धाड

माजलगाव ग्रामीण पोलिसांची दोन ठिकाणी अवैध धंद्यांवर धाड


बीड (रिपोर्टर) माजलगाव ग्रामीण पोलिसांनी काल दोन ठिकाणी अवैध धंद्यांवर धाडी टाकून सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय जोनवाल यांनी केली.

माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लामेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर मोकळ्या जागेवर काही जुगारी जुगार खेळत असल्याची माहिती जोनवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह धाड टाकली असता सतीश दिलीप गायकवाड (रा. लामेवाडी), केशव विठ्ठलराव घोडे (रा. लामेवाडी), जालिंदर रखमाजी मदने हे तिर्रट नावाचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून एक हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले तर दुसरी कारवाई सावरगाव येथील बसस्थानकासमोर करण्यात आली. या वेळी विकास अच्युतराव जगताप हा तेथे मटका घेत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर बुकी बालासाहेब आवारे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ हजार ३१० रुपये व जुगार साहित्य जप्त केले. सदरील कारवाई जोनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड, खताळ यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!