Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआयपीएस कुमावत १५ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी हैद्राबादला

आयपीएस कुमावत १५ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी हैद्राबादला

केजचा पदभार डीवायएसपी वाळकेंकडे
बीड (रिपोर्टर)- सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर धाडसी कारवाया केल्या आहेत. कालपासून ते ट्रेनिंगसाठी हैद्राबादला गेले आहेत. ही ट्रेनिंग पंधरा दिवस चालणार असून केजचा पदभार बीडचे डिवायएसपी संतोष वाळके यांच्याकडे देण्यात आला आहे.
केजचे तत्कालीन डीवायएसपी सावंत हे सेवानिवृत्त झाल्यानंतर काही काळ त्यांची जागा रिक्त होती. त्यानंतर आयपीएस पंकज कुमावत यांनी पदभार घेताच केजमधील अवैध धंदे बंद केले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात कारवाया करण्यास सुरुवात केली होती. काल ते हैद्राबादला पंधरा दिवसाच्या ट्रेनिंगसाठी गेले असल्याने त्यांचा पदभार बीडचे डीवायएसपी संतोष वाळके यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा पोलिसांच्या कारवाया थंडावणार असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!