परळी : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात परळीत शिवसैनिकांनी निदर्शने करत आपला रोष व्यक्त केला. यावेळी बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी करत आम्ही सदैव शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.
बंडखोर आमदारांविरोधत शिवसैनिकात रोष वाढत असून परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात दुपारी 12 वा निदर्शन करण्यात आले.यावेळी राजाभैय्या पांडे शिवसेना विधानसभा प्रमुख,रमेश चौंडे जिल्हा सहसंघटक,दिपक शिंदे उपजिल्हा
प्रमुख युवा सेना,राजेश विभूते शहर प्रमुख,सुदर्शन यादव शहर समन्वयक,मोहन राजमाने,गंगाधर साबळे, शंकर डाके, हनुमान भारती,युवराज सोळंके,विशाल गावडे,अभिजित विभूते,मोहन परदेशी,भागवत करपूडे, निलेश बोतुळे, श्रीकांत विभूते,ईश्वर सोळंके,सतीश शिंदे, अजय शिंदे,रमेश शिंदे यांसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.