वडवणी (रिपोर्टर):- अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सन्मानार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज वडवणी शहराची मुख्य बाजारपेठे कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे.तर ग्रामीण भागातील मराठा समाज देखील खवळला असून विविध आंदोलने करत असून आज सकाळपासूनच शहरासह तालुक्यात आंदोलनाची विविध मालिका सुरु असल्याचे दिसून येत आहे.
आज सकल मराठा समाजाच्या वतीने शहरासह तालुका बंदाची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी समाजाच्या वतीने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून बंद निषेधार्थाची रँली काढण्यात आली आहे. यामध्ये एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, लढेंगे जितेंगे हम सब जरांगे यासह अन्य घोषणा देण्यात आल्या आहेत.
यानंतर बीड-परळी हायवेवर विविध ठिकाणी टायर फूकून देत हायवे बंद करण्यात आला आहे.तर छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी मरिठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरु असल्याने बीड-परळी हायवेवरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. तर उपळी येथील मोबाईल टाँवरवर 16 वर्षीय मुलगी ऋतुजा ज्ञानेश्वर सावंत हिच्यासह उपसरपंचासह अन्य सहा जण, देवडी येथील माजी पं.स.सदस्यासह आठ जण, चिंचोटी येथे सहा जण मोबाईल टाँवरवर चढून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. तर चिंचवण याठिकाणच्या मकरध्वज मंदिरात 45 वर्षीय उत्तेश्वर कोटुळे या इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु गांवकऱ्यांच्या सावध प्रसंगाने अनर्थ टळला आहे. सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पात देखील तरुणानी जलसमाधी आंदोलन सुरु केले असून सोन्नाखोटा आणि पिंपळटक्का येथील रहिवाशी असणारे तरुण महादेव शेळके, तुकाराम लांडे, सुरज लांडे, प्रकाश लांडे, केशव खोटे, ओम कदम, लखन कदम, राजेश साळुंके, गणेश खोटे, गणेश केदार, विजय केदार, भागवत खोटे, दिगंबर खोटे, भैय्यासाहेब खोटे, रमेश महाराज पाण्यात उतरुन जलसमाधी आंदोलन करत असुन याठिकाणी महसुल, पोलीस आणि आरोग्य विभाग दाखल झाले असून जिल्हाधिकारी जोपर्यत इंथ येत नाहीत तो पर्यत जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाहीत अशी भुमिका घेतली असल्याने तालुका प्रशासनापूढे पेच निर्माण झाला आहे.तर शहरात बीड-परळी हायवेवर विविध ठिकाणी टायर पेटविण्यात आले होते. यावेळी आ.प्रकाश सोंळके यांनी काल मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यांची रेकाँर्डिंग व्हायलर झाल्या नंतर समाजामधून संताप व्यक्त केला जात आसताना वडवणी येथे आज आ.सोंळके विरोधात घोषणा देत असभ्य भाषेचा वापर करत संताप व्यक्त केला जात आहे.तर शहर बंदाला देखील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के पाठिंबा दर्शविला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन विशेष लक्ष ठेवत आहे.तर महसुल प्रशासन देखील आंदोलन ठिकाणी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती करत आहेत.