Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशहेंशाहनगर भागात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ नगर पालिकेने बंदोबस्त करावा

शहेंशाहनगर भागात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ नगर पालिकेने बंदोबस्त करावा


बीड (रिपोर्टर):- बीड शहरातील शहेंशाहनगर, पोस्ट कॉलनी, सहारा कॉलनी भागामध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून हे कुत्रे लहान मुलासह नागरिकांना लक्ष करत आहे. सदरील या मोकाट कुत्र्यांचा बीड नगर पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकाकडून केली जात आहे.


बीड शहरातील विविध भागामध्ये मोकाट कुत्र्याने उच्छाद माजवला आहे. हे कुत्रे रात्रीच्या दरम्यान येणार्‍या नागरिकांना लक्ष करत आहे. नगर पालिका प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील शहेंशाहनगर, पोस्टमन कॉलनी, सहारा कॉलनीमध्ये 30 ते 35 मोकाट कुत्रे फिरत असतात. या कुत्र्यामुळे या भागातील नागरिकासह लहान मुलात भितीचे वातावरण निर्माण झाले. हे कुत्रे लहान मुलावर धावून येतात. या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!