शिरूर तालुक्यातील तलावाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवा
अनेक तलावातून पाण्याचा उपसा सुरू
बीड (रिपोर्टर) : शिरूर तालुक्यातील काही तलावात पाणी बर्यापैकी असून सदरील तलावातून पाण्याचा उपसा होऊ लागला. ज्यात लावात पन्नास टक्केच्या आत पाणी आहे त्या तलावातील पाणी उपश्यावर बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. तलावात पाणी राहिल्यास उन्हाळ्यात जनावरांसह माणसांना पाण्याची कमतरता भासणार नाही.
यंंदा बीड जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला. बहुतांश तलाव कोरडे आहेत. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. आष्टी, शिरूर तालुक्यात बर्यापैकी पाऊस पडल्याने येथे पाण्याचा साठा बर्यापैकी जमा झाला आहे. ज्या तलावात 50 टक्केपेक्षा जास्त पाणी आहे त्या तलावातील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्याची मागणी पशुपालकांतून होत आहे. तलावात पाणी राहिल्यास उन्हाळ्यात समस्या निर्माण होणार नाही. सध्या रब्बी हंगाम असल्याने तलावात मोठठ्या प्रमाणावर विद्युत पंप बसवण्यात आले आहेत, हे पंप काढून घेण्याच्या सूचना संबंधितांना द्यावेत, आशी मागणी होऊ लागली आहे.