किल्ले धारूर(रिपोर्टर): अग्रिम पिक विमा मंजूर झाल्याने पीक विम्याची रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत परंतु बँकेने आग्रीमचे रक्कम शेतकर्यांना न देता खात्यातच ठेवली आहे शेतकर्यांचे खाते होल्ड केले आहे यावरून धारूर शहरातील बँकांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. ग्री पिक विमा मंजूर होऊन त्याची 25% रक्कम शेतकर्यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.
शेतकरी पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना आग्रीमची रक्कम देण्यात आली नाही आपले खाते होल्ड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे जिल्हाधिकार्यांनी दोन दिवसांपूर्वीच ग्रीम मधून कर्ज वसुली करू नये शेतकर्यांच्या आडूनुक करू नये असे आदेश जिल्ह्यातील सर्व बँकेला दिलेल्या असताना देखील शहरातील बँकांचा मात्र मगरुरपणा सुरूच आहे त्यांनी शेतकर्यांना पैसे न देता खाते होल्ड केले आहे आपल्याला पैसे मिळू शकत नसल्याचे ते सांगत आहेत यावरून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला शहरातील बँकांनी केराची टोपली दाखवल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाधिकार्यांच्या आदेश जिल्ह्यातील सर्व बँकेंना बंधनकारक असतात तरीपण धारूर शहरातील बँक मंगरूरपणाने शेतकर्यांचे पैसे होल्ड करून ठेवत आहेत अगोदरच शेतकरी अडचणीत असताना अग्रीम कडे डोळे लावून बसलेले होते पण अग्रिम पैसे मिळाले नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. शहरातील बँकांना त्वरित प्रशासनाने नोटीस काढून शेतकर्यांच्या खात्यावरील पैसे त्यांना देण्याची मागणी करावी अशी मागणी आता शेतकरी बांधव करत आहेत.
बँकांना अग्रीमच्या रकमेमधून कर्ज वसुली करता येणार नाही तसेच अनुदान अग्रीम हा वेगळा विषय आहे यातून कर्ज वसुली किंवा खाते होल्ड बँकेला करता येणार नाही अशी जर शेतकर्यांची तक्रार असेल तर त्वरित याबाबत बँकेला खडसावले जाईल. याबाबतीत लक्ष घालून बँक प्रशासनाशी त्वरित संवाद साधून शेतकर्यांच्या अग्रिम रक्कम मिळवून देऊ असे आश्वासन धारूरचे तहसीलदार जीवनकुमार कांबळे यांनी दिले आहे.









