Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावजयमहेश कारखान्यावर बैलगाडी मोर्चा

जयमहेश कारखान्यावर बैलगाडी मोर्चा


शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप न केल्यास तीव्र
स्वरुपाचे आंदोलन करणार -गंगाभीषण थावरे

बीड (रिपोर्टर) माजलगाव तालुक्यातील जयमहेश सहकारी साखर कारखान्याकडून ऊसउत्पादक शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे. उसाच्या नोंदी पुर्ववत करून शेतकर्‍यांचा ऊस गाळपासाठी आणावा, या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी कारखान्यावर बैलगाडी मोर्चा काढला होता.
२०१८-१९ मधील एफआरपी रकमेवरील व्याजाचे ८ कोटी २ लाख रुपये कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेले नाही. त्याचबरोबर उसाच्या नोंदी संदर्भात कारखाना शेतकर्‍यांची दिशाभूल करत असून शेतकर्‍यांची अडवणूक होत आहे. उसाच्या नोंदी पुर्ववत करून शेतकर्‍यांचा ऊस गाळपासाठी आणण्यात यावा या प्रमुख माणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज जयमहेश सहकारी साखर कारखान्यावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन थावरे यांनी संबंधितांकडे दिले. दरम्यान गेटकिन ऊस बंद न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा थावरे यांनी दिला असून पोलीस प्रशासन केवळ आकसापोटी आपल्यावर गुन्हा दाखल करत असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!