वीज कंपनीच्या कर्मचार्यांचा काळ्या फिती लावून निषेध
बीड (रिपोर्टर): गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने बारामती येथील महावितरण कंपनीतील कर्मचारी बनसोडे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेने अवघ्या राज्यात खळबळ उडाली. आज बीड येथील वीज वितरण कंपनीने दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी काळ्या फिती लावून कामकाज केले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
बारामती मोरगाव येथील महावितरण कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून रिंकूताई बनसोडे या कार्यरत होत्या. एका वीज ग्राहकाने जास्तीचे बिल आले म्हणून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघ्या राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. बीड येथील वीज वितरण कंपनी कार्यालयात सदरील घटनेचा निषेध करून बनसोडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तसेच दोषीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.