मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास तरी स्थगित झाल्याची माहिती स्वतः राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन दिली आहे. राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार आहोत, राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान नियोजित अयोध्या दौरा नजीकच असल्याने, यावर चर्चांना उधान आले होते. अखेर आज राज ठाकरे यांच्याकडूनच या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याने, अखेर अयोध्या दौरा स्थगित झाला आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तरप्रदेश मधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी कडाडून विरोध सुरु होता. आधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागा त्यानंतरच अयोध्याला या, अशी ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितले आहे. मात्र आता प्रकृतीच्या कारणामुळे तुर्तास तरी राज ठाकरे यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपली सविस्तर भूमिका मांडतील, सविस्तर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असे राज ठाकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे.
राज ठाकरे यांनी ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित’ असं स्पष्ट शब्दात ट्विट केले आहे. ‘महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलू, रविवारी दिनांक २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे’ असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे