केज (रिपोर्टर): गायरान जमीनीमध्ये 30 ते 40 पारधी समाजाचे कुटुंब राहत आहे. या ठिकाणी पाण्याची कसलीही सोय नसल्याने पाण्यासाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लगाते. उद्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला असून तसे निवेदन केज तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमीनीमध्ये पारधी समाजाचे 30 ते 40 कुटंब राहतात. या ठिकाणी कसल्याही प्रकारची पाण्याची सुविधा नाही. तीन ते चार कि.मी. अंतरावरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागते. एकाही लोकप्रतिनिधीने त्यांच्या पाण्याची समस्या सोडवली नसल्याने पारधी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या वेळी पवार, राजकुमार, सिकंदर शिंदे, लहू काळे, रामेश्वर शिंदे, बप्पाजी काळे, महादेव काळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.










