बीड, (रिपोर्टर)ः-पालवणमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या कारणावरून वाद झाला असुन ही स्मशानभुमी तुमच्या समाजाची नाही. जागा ही तुमच्या समाजाची नाही, त्यामुळे तुम्ही येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करूु नका असे म्हणत तिघाजणांनी मयताच्या नातेवाईकाला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.यामध्ये तिघांविरूध्द अनुजाती जमाती प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी नामे माऊली भारत साबळे याची आजी वृध्दापकाळाने निधन पावली होती. फिर्यादीनामे माऊली साबळे आणि त्यांचे नातेवाईक गावातील स्मशानभुमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेवून गेले असता त्या ठिकाणी माऊली रमेश मस्के, भारत मस्के, रूख्मीणीबाई भारत मस्के यांनी माऊली साबळे यास शिवीगाळ केली. ही स्मशानभुमी स्वर्णसमाजाची आहे. ती जरी सार्वजनिक असली तरी तुमच्या वारलेल्या मृतदेहावर येथे अंत्यसंस्कार करता येणार नाहीत. तुमचे स्वतंत्र स्मशानभुमी आहे मात्र त्याठिकाणी बांधकाम झाले नाही त्याचा आमचा काय दोष. यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. स्मशानभुमीतीलच लाकडे घेवून माऊली साबळे यासह मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वाद झाल्यानंतर काही लोकांनी मध्यस्ती केली. माऊली साबळे यांच्या फिर्यादीवरून वरील तिन्ही आरोपी विरोधात भादंवी 297, 504, 506, 34 सह 3 (1) (आर) (एस)(वाय) याकलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी गोल्डे हे करत आहेत.