पोलिसांबद्दल तीव्र संताप
बीड (रिपोर्टर): गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील गजबजलेल्या अंकुशनगर, भगवाननगर, ग्रामसेवक कॉलनीत चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी एक-दोन जणांना चोरटट्यांकडून मारहाणीच्या घटनाही घडलेल्या आहेत. तेव्हापासून या भागातील नागरीक बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत स्वत:च गस्त घालत आहेत. पोलिसांची पेट्रोलिंग मात्र होत नही. त्यामुळे नागरीकात पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या भागातील वस्तीसोबतच भक्ती कन्स्ट्रक्शन, ज्ञानेश्वर नगर, पांगरी रोड, या भागातही गेल्या आठ दिवसांपूर्वी किगरकोळ चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक वेळा शिवाजीनगर पोलिस ठाण्याला नागरिकांनी पोलिसांची गस्त वाढवण्याबद्दल निवेदने दिले आहेत. हे निवेदने दिल्यानंतर अंकुशनगर आणि भगवाननगर भागात एक-दोन दिवस पोलिसांनी पेट्रोलिंग केली आणि उलट नागरिकांनाच तुम्ही जे गस्त घालण्याचे काम केले आहे ते चांगले असून अशीच गस्त घालत जा, असा उलट सल्ला दिला. पंधरा दिवसांपासून चोरांची दहशत असतानाही पोलीस मात्र काहीच करत नाहीत. पोलीस अधिक्षकांनी तात्काळ यात लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त करावा आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी शहरातील नागरिकातून होत आहे.










