दिंद्रुड( रिपोर्टर) :-दिंद्रुड पासून जवळच असलेल्या कांदेवाडी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी वस्तीगृहाकडे जेवणासाठी जात असताना रस्त्यात साप चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना कादेवाडी येथील आदिवासी आश्रम शाळेत सायंकाळी घडली. सागर पवन काळे वय 11 वर्ष असे मयत मुलाचे नाव आहे.
धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथे आदिवासी शासकीय आश्रम शाळा आहे.या ठिकाणी आदिवासी प्रवर्गातील गोरगरिबांची मुले शिक्षण शिक्षण घेतात. जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील ही आदिवासी समाजाची लोक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी घरदार सोडून या ठिकाणी पाठवतात परंतु त्याच मुलांची सुरक्षा रामभरोसे असून या ठिकाणी शिक्षण घेणारा सागर पवन काळे या पाचवीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच सर्पदंश होऊन मृत्यू झाला असून या घटनेला नेमके जबाबदार कोण असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. सदरील विद्यार्थ्याला साप चावल्याचे लक्षात येतात शाळेतील शिक्षकांनी त्या सदर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यास पुढील उपचारासाठी माजलगाव येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शाळेच्या आवारात सगळीकडे घाणच घाण स्वयंपाक घराच्या आजूबाजूला व शाळेच्या परिसरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य असून स्वयंपाक घराच्या पाठीमागे उरलेले शेळ्यांना फेकून दिले जात असल्यामुळे ते खाण्यासाठी असे हिंस्र प्राणी शाळेच्या आवारात येतात असे काही पालकांचे म्हणणे आहे.
घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाई करा स्वतः जिल्हाधिकारी यांनी या घटनेकडे लक्ष देऊन सदरील घटनेची योग्य ती चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पालक करत आहेत.