सतीश भोसले खोक्या नव्हे तर आमचा विठ्ठल,मित्राच्या हातावर टॅटू;
तुळजापुर (रिपोर्टर) ः भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची दहशत सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्यानंतर आधी वनविभागाची कारवाई आणि नंतर 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याचवेळी धाराशिवात मात्र,सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल असे म्हणत मित्रांच्या हातावर विठ्ठल नावाचे टॅटू काढलंय. सतीश भोसलेची चुकीची प्रतिमा तयार केल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला आहे .वनविभागाकडून केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात आदिवासी समाजाने रास्ता रोको केलाय. या रास्ता रोको ला दलित पँथरचा ही सक्रिय पाठिंबा आहे.
वनविभागाच्या अधिकार्यांवर कारवाई करावी,सतीश भोसलेचा जातीवाचक उल्लेख करणार्यांवर ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच सतीश भोसले यांच्या कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.राजकीय उट्टे काढण्यासाठी सतीश भोसलेला टार्गेट केल्याचा आरोपही आदिवासी समाजातून करण्यात आलाय.