जानेवारी महिन्यात मागवले होते अर्ज

बीड, (रिपोर्टर) ः ज्यांना हक्काचा निवारा नाही, त्यांना पंतप्रधान आवास योजनेसह इतर योजनेअंतर्गत घरकुल दिले जातात. ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन सर्व्हे होतो. तर शहरी भागात अर्ज मागवले जातात. बीडमध्ये जानेवारी महिन्यात रमाई घरकुलासाठी अर्ज मागवण्यात आले होते. या अर्जाबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. रमाई घरकुल लाभार्थ्यांची यादी कधी जाहीर होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकर यादी जाहीर झाली तर लोकांना कामे करता येणार आहेत.
बीड शहरातील अनेक नागरिकांना हक्काचा निवारा नाही. बहुतांश नागरिक किरायाने राहतात तर काही नागरिकांना जागा आहे पण छत व्यवस्थित नाही. ज्यांना चांगला निवारा नाही. त्यांच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत व इतर योजनेअंतर्गत घरकुल दिले जातात.
बीड नगर पालिकेने रमाई घरकुलसाठी जानेवारी महिन्यात अर्ज मागवले होते. या अर्जाबाबत अजूनही निर्णय झाला नाही. अर्जाची छाननी करून संबंधित लाभार्थ्यांचे योग्य ते कागदपत्रे घेऊन रमाई घरकुलाची नवीन यादी तत्काळ जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. उन्हाळ्यामध्ये यादी फाईनल झाली तर लोकांना घरकुलाचे काम करता येणार आहे.





