
आष्टी (रिपोर्टर):-तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वार्यासह येणार्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत.घरावरील पत्रे उडाले या मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका हा बसला आहे. शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा काल दि.22 मे रोजी दुपारी 4 ते 5 तास धो-धो पाऊस झाल्याने नदी ओढ्यांना पूर आला होता.घरांची पडझड वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला आहे. गाय, कालवड पशुधन दगावले आहेत. तसेच घरांची पडझड होऊन नागरिक बेघर झाले.
शेतकर्यांच्या फळबागा, तृणधान्य आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात शेतातील कांदा, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काही शेतकर्यांच्या कांदाचाळीत पाणी शिरले तर भुईमूगाला शेंगा आल्या सांगवीत विज पडुन गाई व कालवडीचा मृत्यू झाल्याची घटना तर ,ब्रम्हगांवह व चिंचाळ्यात कांदाचाळीत पाणी ,बावीत पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.तहसिलदार वैशाली पाटील,कृषी अधिकारी गोरख तरटे शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी विभागाला दिले आहेत.
मान्सून पूर्व पावसामुळे आष्टी तालुक्यात मे महिना सुरू झाल्यापासून अवकाळीने थैमान घातले आहे. यामुळे कांदा पिकाची नासाडी तर फळबाग उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक वर्षांनंतर मे महिन्यात पिकांना अवकाळीचा इतका मोठा फटका बसला आहे. काल गुरुवारी दि.22 मे रोजी दुपारी जोरदार वादळी वार्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली तब्बल 4 ते 5 तास पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने नदी नाल्यांना पूर आला होता.पूर परिस्थिती निर्माण झाली होती.रात्री झालेल्या पावसामध्ये मौजे सांगवी पाटण येथे दत्तु विठ्ठल भोसले यांची एक गाय व कालवड वीज पडून मृत्यू झाली आहे.
मौजे बावी येथील मच्छिंद्र त्रिंबक लटपटे यांच्या काल रात्रीच्या अवकाळी पाऊस आणि वार्यामुळे गाईच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले आहेत. ब्रम्हगांव येथील शेतकरी संतराम वायकर यांचा कांदा पिकाचे काल झालेल्या पावसाने नुकसान झाले आहे.तालुक्यात आज ही सकाळपासून पाऊस सुरू आहे.अजूनही दररोज अवकाळी पाऊस कहर करत असल्याने नुकसानीचा आकडा वाढू शकतो. सर्वाधिक फटका फळबागा ,कांदा, भाजीपाला व आंबा, भुईमूग पिकाला बसला आहे.मात्र अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यानं नुकसानग्रस्त पिकांचा आकडा रोजच वाढत आहे.
उन्हाळ्यात पूरस्थिती मे महिन्यात नदीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती नागरीकांनी दिली. या पाणीसाठ्यामुळे भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दुर्घटना देखील घडल्या आहेत.शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.