
ऑगस्ट महिन्यातील आंदोलनाच्या अनुषंगाने संवाद
गेवराई (रिपोर्टर): ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई येथे आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला असून आंदोलनाच्या अनुषंगाने आज त्यांनी गोदाकाठच्या 123 गावकर्यांची बैठक घेतली. या बैठकीला गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
महाकाळा येथे 123 गावकर्यांची बैठक बोलावली होती. सकाळी बैठकीला सुरुवात झाली होती. गावकर्यांशी सुसंवाद साधत मनोज जरांगे यांनी आपले मत व्यक्त केले होते. ऑगस्ट महिन्यात मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार असल्याने यासंदर्भात आजची बैठक आयोजीत करण्यात आली होती.