
भीषण अपघात 20 फुट महिलेला ट्रकने फरफटत नेले
बीड अहिल्यानगर रोडवर आष्टी शहरात घडली घटना
आष्टी (रिपोर्टर):- मालवाहतूक ट्रकने दुचाकीवरून पती व पत्नी जात असलेल्या गाडीवरील महिला ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी बीड अहिल्यानगर रोडवर आष्टी शहरात सावळेश्वर ट्रॅक्टर्स समोर घडली घटना इतकी दुर्देवी होती की अपघातात 20 फुट महिलेला ट्रकने फरफटत नेले
रविवार सकाळच्या 10 च्या सुमारास अहिल्यानगरच्या दिशेने दुचाकी एम एच 20 बी.डी.5701 वरुन पती व पत्नी जात असताना आष्टी शहरातील सावळेश्वर ट्रॅक्टर्स समोर करिष्मा आयास सय्यद ( वय 24 वर्षे) या शेजारी जाणार्या मालवाहतूक ट्रक (के.ए.39 6570) या ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या.दुचाकीस्वार आयास सय्यद ( 30 वर्ष करिमनगर रा.मुर्शदपुर ,आष्टी ) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून अपघाताची माहिती आष्टी पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, अशोक तांबे,बब्रुवान वाणी,सतिश मुंडे, गणेश राऊत, गणेश गिते यांनी तात्काळ धाव घेत अपघातात जखमी यांना उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात हलविले. अपघातात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेला. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलिस ठाण्यात सुरू आहे.
000





