
नागरीकांना धोका होण्याची शक्यता
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरातील विविध भागामध्ये विजेच्या तारा खाली लोबलेल्या असतात. यामुळे कधीही धोका होवू शकतो. शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन एकनाथ नगर परिसरात विजेच्या तारा खाली आलेल्या आहेत. या तारा संदर्भात अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत.मात्र याची दखल घेतली जात नाही. एखादी दुर्देवी घटना घडल्यानंतर वीज कंपनी जागी होणार का? असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.
भक्ती कन्स्ट्रक्शन एकनाथ नगर येथे वीजेच्या तारा खाली आलेल्या आहेत. अवघ्या दहा फुटावर त्याचे अंतर आहे.वीज वितरण कंपनी खाली आलेल्या तारा व्यवस्थीत करत नाही. एखादी दुर्देवी घटना घडल्यानंतर कंपनीचे कर्मचारी जागे होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान येथील तारा दुरूस्त करण्याची मागणीकेली जात आहे. काही दिवसापुर्वीच एक चार चाकी गाडीवर विजेची तार तुटून पडली होती.





