
बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ म्हणून जितीन रहमान आले आहेत. त्यांनी आज आपला पदभार घेतला. अतिरिक्त सीईओ वासुदेव सोळूंके यांनी त्याचे स्वागत केले.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ आदित्य जिवने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मुरूंगनाथम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते बीडला रूजू झाले नसल्याने जितीन रहमान यांना बीडच्या सीईओ पदी नियुक्ती दिली गेली. आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार घेतला.नवीन सीईओ रहमान यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळूके यांनी स्वागत केले.





