
शेतकर्यांनी दिला कुलूप ठोकण्याचा इशारा
बीड (रिपोर्टर): गढी येथील बँक ऑफ महाराष्ट्राला एक महिन्यापासून मॅनेजर नसल्याने शेतकर्यांची कामे खोळंबून पडली आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. खरीप हंगामात शेतकर्यांची कामे या बँकेतून वेळेवर होत नसल्याने सदरील शेतकर्यांनी बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
गेवराई तालुक्यातील गढी येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये गेल्या एक महिन्यापासून मॅनेजर नाही. मॅनेजरअभावी बँकेची कामे खोळंबून पडली आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकर्यांना पीककर्ज दिले जात आहे. मॅनेजर नसल्याने शेतकर्यांची कामे होत नाहीत. येत्या चार दिवसात बँकेला मॅनेजर न दिल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.











