
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत काम बंद आंदोलन.
बीड (रिपोर्टर) आज बीड शहरातील सरकारी परिचारिका कॉलेज च्या विद्यार्थिनी, शिक्षिका, यांनी काम बंद आंदोलन करत कॉलेज च्या गेट ला कुलूप लावले आहे. कोणत्याच मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी आज हे पाऊल उचलले होते.
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापक शिक्षक प्रिन्सिपल यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी या अगोदर अनेक आंदोलने करण्यात आली. सरकार दरबारी देखील निवेदनाद्वारे मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने शिक्षक प्राध्यापक यांनी गेल्या दोन दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू केला होत. जर दोन दिवसात मागण्या मान्य नाही झाल्या तर गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज बंद पाडू आणि काम बंद आंदोलन सुरू करू. असा इशारा दिला होता. मात्र दोन दिवसात कसलाही सरकार निर्णय घेत नसल्याने अखेर शिक्षक, प्राध्यापक, यांनी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मागण्या मांडत कॉलेज बंद केलं आहे. यामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सरकारला इशारा देत आपल्या मागण्या मांडल्या आहेत. महाराष्ट राज्य परिचारिका संघटना व असोसिएशन टीचर संघटना यांच्या वतीने 15 व 16 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते.
पण त्या आंदोलनाला कसल्याही प्रकारची शासनाकडून दाद मिळाली नसल्याने आज सर्व विद्यार्थिनी व शिक्षकांनी काम बंद आंदोलन करत कॉलेज ला कुलूप लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. वेतनस्तर वाढवण्यात यावा, परिचारिकांची कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे, व विद्यावेतन वाढवण्यात यावे. तसेच या कॉलेज ला प्रिन्सिपल व व्हाइस प्रिन्सिपल नसल्याने गैरसोय होत असून ते पदही भरण्यात यावे, या सर्व मागण्यांसाठी आज काम बंद आंदोलन करण्यात आले. जर का ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढेही काम बंद आंदोलन चालूच राहील असा शिक्षिका, व विद्यार्थिनी यांनी इशारा दिला.








