बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा परिषदेमधील शिक्षक बिंदू नामावली व अंतर जिल्हा बदलीमधील अनियमिततेविरोधात जिल्हा परिषदेसमोर आज खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ महाराष्ट्राच्या वतीने धरणे करण्यात आले.
या वेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिंदुनामावलीतील अत्यंत गंभीर अशा अनियमिततेसंदर्भात अवगत करण्यात आले होते व संदर्भ क्र. 1 व 2 च्या निवेदनानुसार आमच्या मागण्यांसंदर्भात 1 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे या कार्यालयाला कळवण्यात आले होते. मात्र कुठलीही कारवाई न केल्याने खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या कर्मचार्यांनी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलेले (पान 7 वर)
आहे मात्र तरी देखील त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. केवळ खुला प्रवर्गातील बांधवांच्या बदल्या रोखण्यासाठी पोर्टलवर चुकीची बिंदु नामावली सादर करण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या वेळी विनोद सवासे, बी.व्ही. वराट, बी.आर. घुमरे, राजेंद्र भोसले, अविनाश खोसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.